पिरामलतर्फे दिवाण हाउसिंग फायनान्सचे (डीएचएफएल) संपादन व विलिनीकरणासाठी मोबदला भरला

पनवेल-नवी मुंबई (प्रतिनिधी) 
पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडने दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) संपादन मोबदल्याचे पैसे भरून आर्थिक सेवा क्षेत्रात आयबीसी पद्धतीअंतर्गत पहिला यशस्वी ठराव पूर्ण केल्याचे जाहीर केले. मूल्याच्या बाबतीत हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा ठराव असून त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य ठरावांसाठी मापदंड प्रस्थापित झाला आहे.
 याप्रसंगी पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले, ‘या लक्षवेधी संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे भरल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आपल्या देशातील वंचित व दुर्लक्षित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा आघाडीचा, डिजिटल दृष्टीकोन असलेला, वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा समूह बनण्याच्या आमच्या नियोजनाला चालना मिळाली आहे. दिवाळखोरीविषयक (इनसॉल्वहन्सी) ठाम नियम हे कोणत्याही आधुनिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. दिवाळखोरीशी संबंधित ऐतिहासिक सुधारणांमुळे अशाप्रकारचे गुंतागुंतीचे ठराव जास्त समग्र आणि वेळेत सोडवणे शक्य झाले आहे.

   पिरामल समूहाचे कार्यकारी संचालक आनंद पिरामल म्हणाले, यातून एकत्रितपणे ३०१ शाखा, २३३८ कर्मचारी आणि एक दशलक्ष आजीवन ग्राहकवर्ग तयार होईल. वेगाने विकसित होत असलेल्या परवडणाऱ्या गृह बांधणी क्षेत्रात आमच्या कंपनीचे वर्चस्व असेल. गेल्या दोन वर्षांत आम्ही यशस्वीपणे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म, आधुनिक अनालिटिक्स इंजिन आणि एआय/एमएल क्षमता तयार केल्या आहेत. या संपादनामुळे आम्हाला हे तंत्रज्ञान जास्त मोठ्या ग्राहकवर्गासाठी राबवता येणार आहे. नवी एकत्रित कंपनी भारतातील डिजिटल- फर्स्ट रिटेल कर्ज बाजारपेठेत आघाडीवर असेल.
Comments