मोफत विधी सेवा जनजागृती शिबिर संपन्न...
मोफत विधी सेवा जनजागृती शिबिर संपन्न...
पनवेल दि,०७ (वार्ताहर) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सर्वोच्च न्यायालयातर्फे भारतभर जनजागृती अभियान दि २.१०.२०२१ ते दि.१४.११.२०२१ पर्यंत राबविला जात आहे. त्यानुसार तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायालय पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन तर्फे तहसिल कार्यालय पनवेल येथे ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा या विषयाबाबत जनजागृती शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक उपस्थित होते.
           या शिबिरासाठी ज्येष्ठ विधीज्ञ अनिल जाधव, वकील पनवेल बार असोसिएशन यांनी मार्गदर्शन केले, तसेच विजय तळेकर, तहसिलदार पनवेल यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध सुविधा याबाबत माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. तसेच अमिटी लॉ कॉलेज चे विद्यार्थी गिरीश अंबापकर आणि प्रिया नायर, ज्येष्ठ नागरिक संघ पनवेलचे अध्यक्ष नंदकुमार जोशी आणि मान्यवर उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करणेसाठी तहसिल कार्यालयातील कर्मचारी तसेच पनवेल बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. पनवेल बार असोसिएशनचे वरिष्ठ वकील.मनोज म्हात्रे, वकील धनराज तोकडे, वकील इंद्रजित भोसले यांचे विशेष सहाय्य मिळाले. यावेली तुम्हाला न्याय मिळेल त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी इथंपर्यंत पोहोचले पाहिजे असे मत जाधव यानी मांडले. शिबिरात जेष्ठांनी आपल्या समस्या मांडल्या.
Comments