रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचा उपक्रम - गरजूंना मिळणार रुपये १ दर दिवसाच्या दराने वस्तू ...
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचा उपक्रम - गरजूंना मिळणार रुपये १ दर दिवसाच्या दराने वस्तू .....

पनवेल वैभव / प्रतिनिधी : -  रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज रुग्ण सहाय्यता वस्तू केंद्राचे उद्घाटन सुखापुर येथे अंत्यविधी सेवा संस्था यांच्या ऑफिसमध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे 
डी जी पंकज शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
या सेंटर मधून गरजू रुग्णांना बरे होण्यासाठी लागणाऱ्या सहाय्यक वस्तू ह्या रोज रुपये १ या दराने देण्यात येणार आहेत. असे एकूण ५ सेंटर पनवेल व आजूबाजूला परिसरात सुरु करण्यात येणार आहेत.

या प्रोजेक्टसाठी क्लबचे ए जी डॉ. रो. सागर गुंडेवार, क्लबचे अध्यक्ष रो रुपेश यादव, सेक्रेटरी रो बाळकृष्ण आंबेकर, अडमिन डायरेक्टर रो विजय गोरेगांवकर, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रो. विजयकुमार कुलकर्णी, प्रोजेक्ट डायरेक्टर रो प्रदीप ठाकरे, एन्स शालिनी ठाकरे, रोट्रॅक्ट प्रज्वल आणि इतर रोटरी सदस्यआणि सुखापुर मधिल काही नागरिक उपस्थित होते. 
क्लबचे अध्यक्ष रो. रुपेश यादव यांनी अशा वस्तू विनावापर जर कोणाकडे उपलब्ध असतील किंवा ज्यांना अशा वस्तू  या प्रोजेक्ट साठी दान करावयाच्या असल्यास त्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क: ९८३३१०४४८७
पहिले केंद्र सुखापूर, नविन पनवेल परिसरात सुरू करण्यात आले.
या केंद्रात प्रत्येकी एकूण खालील उपकरणांची २ जोड्या ठेवण्यात आल्या आहेत;
१. चालणयासाठी काठी
२. टॉयलेट सीट
३. युरिन पॉट 
४. वॉकर
५. व्हील चेअर
६. स्ट्रेचर
७. पाण्याच्या बेड
८. नेब्युलायझर
९. बीपी आपरेटर
१०. प्रौढांचे डायपर
इ.वस्तू. उपलब्ध असतील.
Comments