मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः  जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धा 2021मध्ये भारतासह महाराष्ट्र व नवी मुंबई पोलीस दलाचे नाव उचावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पूजारी यांनी उजबेकीस्तान येथील स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्या बद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून विशेष सत्कार केला.
यावेळी मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यासह पत्रकार संजय कदम व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष पुजारी यांनी या स्पर्धेत दैदिप्यमान असे यश संपादन केले आहे. याचा आम्हाला गर्व असून आगामी काळात सुद्धा त्यांनी अशा वेगवेगळ्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सहभाग घेवून भारताचे नाव उंचवावे अशा शुभेच्छा विक्रांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

Comments