मुंबई महापौर नॅशनल चॅम्पीयन स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्सचे यश
पनवेल / प्रतिनिधी : मुंबई येथील अंधेरी येथे झालेल्या मुंबई महापौर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशनने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत या असोसिएशनचे सात स्पर्धक सहभागी झाले होते. 
अंधेरी येथे मुंबई  महापौर नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल आर्मर्स्पोर्ट्स असोसिएशन चे ७ खेळाडू  साठी सहभागी झाले होते . त्या मध्ये पुरुष ८० किलो वजनी व ३५ ते ५० वय गटात संजय बोराडे यांनी उजवा हात सुवर्ण पदक तर डावा  हात रजत पदक मिळवले. ७० किलो वजनी आणि ३५ ते ५० वय गटात संतोष भाटकर यांनी डावा हात सुवर्ण पदक मिळवले. ७० किलो वजनी गटात १८ ते २५ वय यामध्ये प्रदीप माळी यांनी उजवा हात रजत तर डावा हात कांस्य पदक मिळवले. महिलांच्या ६५ किलोच्या गटात योगिता मिश्रा यांनी २५ ते ३० गटात डावा हात एक सुवर्ण तर पूजा बुलानी उजवा हात १ सुवर्ण पदक मिळवले. सुमन तिवारी यांनी ७० किलो आणि ३५ ते ५० वयोगटात १ रजत पदक मिळवले. याच असोसिएशनच्या २५ ते ३५ वय आणि ७० किलो वजनी गटात उजवा हात सहभाग प्रमाण पत्र देखील मिळाले. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून याच असोसिएशनच्या संतोष भाटकर आणि संजय बोराडे यांना देखील गौरविण्यात आले. यांच्या या कामगिरीमुळे पनवेलचे नाव देशात उंचावले असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांना मोहोड आणि डाके यांनी मार्गदर्शन केले होते. 
Comments