"मिशन युवा स्वास्थ्य" मोहिमेसाठी पनवेल महानगरपालिका सज्ज....


"मिशन युवा स्वास्थ्य" मोहिमेसाठी पनवेल महानगरपालिका सज्ज....
 
पनवेल, दि.२४ : महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु व्हावीत यादृष्टीने कोव्हीड१९ लसीकरणाला वेग देत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ्य मोहिम महापालिकेने हाती घेतलीआली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 25 ऑक्टोबरपासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत फक्त महाविद्यालयांतील १८ वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत 33 महाविद्यालयामध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण कोकण विभागाचे विभागीय सहसंचालक यांच्याशी संपर्क साधून आज ( २४ ऑक्टोबरला) भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये या मोहीमचे उद्घाटन पालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, महाविद्यालयाचे प्राचार्या ॲड. शीतला गावंड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. श्रेयस पाटील आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मा.आमदार  प्रशांत ठाकूर यांनीही या लसीकरण सत्राला भेट दिली.

  2 नोव्हेंबर पर्यंत "मिशन युवा स्वास्थ्य" मोहिम सर्व महाविद्यालयांमध्ये राबविली जाणार. याठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस  दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही या मोहिमेमध्ये लसीकरण केले जाणार आहे. याबरोबरच सर्व सामान्य नागरिकांचे पालिकेच्या नियमित लसीकरण केंद्रावरती लसीकरण सुरू आहे.

 महाविद्यालयांलयीन विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याकरिता मिशन युवा स्वास्थ यशस्वीपणे राबविण्यासाठी  आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
Comments