यशस्वीपणे लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याबद्दल पारगाव ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक....
यशस्वीपणे लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याबद्दल पारगाव ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक....
पनवेल, दि. १३ (वार्ताहर) ः तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी यशस्वीपणे लसीकरण मोहिम सातत्याने राबविण्यात येत असल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक व त्यांच्या सहकार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत असून आजही त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली आहे. 
लसीकरण पूर्ण करूया कुटुंब समाज सुरक्षित करूया मिशन कवच कुंडल अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबवले जात आहे. त्यानुसार लसीकरण पूर्ण करूया असे आव्हान ग्रुप ग्रामपंचायत पारगाव च्या वतीने सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांनी आपले कुटुंब आणि आपला समाज सुरक्षित करूया असे आव्हान नागरिकांना आव्हान केले आहे. वैद्यकीय आरोग्य गव्हाण कोपर डॉक्टर अस्मिता पाटील विभागामार्फत मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण राबवले जात आहे. 100% नागरिकांना पहिला डोस चे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील ज्या 18 वर्षावरील नागरिकांना पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तीना डोस देण्यात आले. कवचकुंडल अभियान कोल्ही आदिवासी वाडी येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक उपसरपंच सौ अंजली राहुल कांबळे मा उपसरपंच मनोज राम दळवे मा उपसरपंच सुशील कांत तारेकर ग्रामपंचायत सदस्य विजय वाघे मा सरपंच बेबी मारुती वाघे सदस्य सौ सुनंदा हरिभाऊ नाईक सदस्य सौ निशा रत्नदीप पाटील आरोग्य सेविका अलका वायर रे तसेच आरोग्य अधिकारी अधिकारी स्वप्नील पाटील तसेच अंगणवाडी सेविका सौ सरिता पाटील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील व आशा वर्कर सौ वर्षा तारेकर आदी उपस्थित होते.


फोटो ः आदिवासी वाड्यांमध्ये लसीकरण मोहिम
Comments