घातक हत्यार तलवार जवळ बागळल्या प्रकरणी एकास अटक....
घातक हत्यार तलवार जवळ बागळल्या प्रकरणी एकास अटक....

पनवेल, दि. ११ (संजय कदम) ः घातक हत्यार तलवार जवळ बाळगली म्हणून एकास तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बॉम्बे बिअर कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रस्त्यावर एका इसम त्याच्या ताब्यात बेकायदेशीररित्या घातक असे तलवार बाळगून असल्याची माहिती  तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.(गुन्हे) किंद्रे, सपोनि बाळासाहेब शिंदे, राजेंद्र जाधव, पो.कॉ.संदेश उतेकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपी लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ वाघ्या उर्फ लकी याला तलवारीसह ज्याची किंमत जवळपास 1200 रुपये इतकी आहे ताब्यात घेतले आहे व त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह म.पो.कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे कारवाई केली आहे.
Comments