पनवेल महानगरपालिकेच्या ५ व्या वर्धापनदिनी वृक्ष लागवड व कापडी पिशव्या वापर जनजागृती मोहीमेस सुरूवात...
पनेवल / दि.5 : पनवेल महानगरपालिकेच्या ५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून व “आझादी का अमृत महोत्सव” २०२१-२२ सेव्ह कासाडी रिव्हर, फाईट अगेंस्ट वॉटर पोलूशन मूव्हमेंट आणि पनवेल महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रभाग क्रमांक ७ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड आणि कापडी पिशव्या वापर जनजागृती मोहीमेस सुरूवात करण्यात आली. पनवेल महानगरपालिका आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 
पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशवीचा वापर झाला पाहिजे यासाठी योगेश पगडे आणि संदीप सिंग यांनी ‘स्टिच अ बॅग’ ही संकल्पना सुरुवात केली आहे. या संकल्पने अंतर्गत घरोघरी जाऊन वापरलेल्या कपड्यापासून पुन्हा कापडी पिशव्या बनवल्या जात आहेत. अशा पध्दतीने परिसरातील लोकांना मुफ्त कापडी पिशव्या वापरण्याची मोहीमेस त्यांनी सुरवात केली आहे. 

मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, प्रमुख पाहुणे आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, व हरेश कांबळे, अखिल रोकडे, संदीप सिंग, योगेश पगडे, आतमाराम कदम, सुनील भोईर, सागर राजे, गोविंद जोशी, सुमेध गायकवाड, अमोल कांबळे, अभिजित भवर, दिग्नेश भोईर, अमित जाधव व प्रभाग-७ चे सर्व स्वच्छता दूत उपस्थित होते.
Comments