स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दूतांचा ‘कोरोना योद्धा' पुरस्काराने गौरव...


पनवेल / वार्ताहर : - पनवेल महानगर पालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता दूतांचा ‘कोरोना योद्धा' म्हणून सत्कार करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर व इतर मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.  
 पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात झालेल्या या कोरोना योध्यांच्या सत्कार कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, विभाग प्रमुख अनिल कोकरे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, शहर समन्वयक सदाखत अली अन्सारी, स्वछता निरीक्षक अभिजित भवर यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगीतले की, पनवेल महापालिकेच्या सफाई विभागाच्या माध्यामातून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामामुळे रोग राईचे प्रमाण कमी झाले असून, शहरातील स्वच्छते मुळे नागरीकांना शहरामध्ये फिरण्याचा अनुभव घेता येत आहे.असे सांगत त्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
Comments