दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद : 'मी आणि नथुराम' पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन...


दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद : 'मी आणि नथुराम' पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन...
पनवेल / ( प्रतिनिधी) : भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने संवादमाला पुष्प-3 अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेेते आणि लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा हा कार्यक्रम शनिवारी (दि. 23) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झाला. या कार्यक्रमात एबीपी माझा वृत्तवाहिनीचे निवेदक दीपक पळसुळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी पोंक्षे यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
या कार्यक्रमाला भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक उमेश घळसाशी, पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र अमले, प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, इतिहास अभ्यासक तथा ’मी आणि नथुराम’ पुस्तकाचे प्रकाशक पार्थ बावस्कर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, नाट्य परिषद पनवेल शाखा सचिव श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेल कोकण प्रदेश संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार, अक्षया चितळे, जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, शहर संयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, सदस्य अमोल खेर, अथर्व गोखले, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
या वेळी शरद पोंक्षे म्हणाले की, लहानपणापासूनच नटाखेरिज दुसरे काही व्हायचे नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसे भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचे सारे श्रेय परमेश्वराला देतो. मी कुठल्याही भूमिकेचा फार अभ्यास करीत नाही. मी फक्त त्या व्यक्तिच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना ते आवडते.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला झालेल्या विरोधाविषयी पोंक्षे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, या नाटकाला झालेल्या राजकीय विरोधाचा अंत नाही. गेली 20 वर्षे कधीही शेवटच्या प्रयोगापर्यंत हा प्रश्न सुटला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले सतत विरोध करीत राहिले. नेत्यांना वैचारिक बैठक नाही. इतिहासाबद्दल माहीत नाही, तर कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार? 
या वेळी ’मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
Comments