बाल कामगारांची करण्यात आली सुटका....
दोन बाल कामगारांची करण्यात आली सुटका....

पनवेल दि. १० (वार्ताहर)- नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून दोन बाल कामगारांची सुटका केली. तसेच या बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणाऱ्या एका आस्थापना चालकातील दोंघावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
          कळंबोली पोलीस मुख्यालयाच्या समोरील एका स्वीट्सच्या दुकानांमध्ये दोन बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोनावणे यांनी आपल्या पथकासह या आस्थापनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील त्यांच्या पथकाने कळंबोली येथील स्वीट्सच्या दुकानात छापे मारले. यावेळी दोन बालकामगारांची सुटका करण्यात आली. हसमुख भिमजी पटेल राहणार डि स्प्रिंग सोसा, रोडपाली कळंबोली, लोकेश लिंगे गौंडा राहणार गणेशधाम सोसा से-21 कामोठे यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात बालकामगार, प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम व अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments