राहत्या घरातून मोबाईलसह रोख रक्कम लंपास...
राहत्या घरातून मोबाईलसह रोख रक्कम लंपास...

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह मोबाईल चोरुन नेल्याची घटना साई येथे घडली आहे.
या ठिकाणी राहणारे हिमांशु बाबर खान (21) यांच्या रुमचा दरवाजा दोरीने बांधून ते झोपले असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाची दोरी कशानेतरी तोडून दरवाजावाटे आत प्रवेश करून तेथे असलेला 5 हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन व एक हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments