जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळालाच पाहिजे ; काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत....
जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळालाच पाहिजे ; काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत....

पनवेल / वार्ताहर : - 
 कामगार नेते महेंद्र् घरत यांनी रायगड कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जसा रायगड कॉंग्रेस मध्ये नवचैतन्य आले आहे. तसेच न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेमध्ये सुद्धा कामगारांचा ओघ वाढत आहे. नामफलक अनावरणासाठी अनेक कंपन्यातील कामगार प्रतीक्षेत आहेत. त्यातील मे. ग्लोबिकॉन, कोप्रोली व स्थानिक टेम्पो चालक असोसिएशन या दोन कंपन्यातील संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष तथा न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. जानेवारी २०२१  पासून १५ नवीन कंपन्यांतील कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे, तर १२ कंपन्यातील कामगारांसाठी आतापर्यंत पगारवाढीचे करार करण्यात आले आहेत. संघटनेच्या याच कार्यशैलीवर प्रभावित होऊन कामगार न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेकडे आकर्षिले जात आहेत.
 नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस श्री. वैभव पाटील, उपाध्यक्ष श्री. किरीट पाटील, विनोद म्हात्रे, प्रेमनाथ ठाकूर, जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ते – राम भगत, महेंद्र ठाकूर, भाई म्हात्रे, रेखा घरत, निर्मला पाटील, संघटक – लंकेश ठाकूर, कल्पना ठाकूर, योगेश रसाळ, आदित्य घरत, अरुण पाटील, अरुण म्हात्रे, विवेक म्हात्रे, सुजित म्हात्रे, अंगत ठाकूर, संदीप म्हात्रे, प्रांजल भोईर, राजाराम ठाकूर, आनंद ठाकूर तसेच मोठ्या संखेने कामगार व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments