आदई तलावात लोक सहभागातून स्वच्छता ;
जलाशय प्लास्टिक व निर्माल्य मुक्तीचा अनोखा संकल्प ....
पनवेल / वार्ताहर : - पनवेल वेस्ट वारियर्सनी जनजागृती करण्यासाठी आदई हिरवाई ग्रुप, CKT एनसीसी, क्रियेट टुगेटर फाऊडेंशन, पतंजली योग ग्रुप, रोबिनहुड आर्मी, रोटरेक्ट व रोटरी क्लब ऑफ पनवेल, संकल्प फाउंडेशन, सिंधुदुर्ग रहिवाशी संघ यांना एका छत्राखाली आणले. सर्वांनी मिळून, आदई तलाव लोकसहभागातून स्वच्छ करण्याचे काम 28 नोव्हेंबर 2021 पासून हातात घेतले. त्यासाठी क्लीनअप ड्राईव्ह योजले. सामाजिक कार्य करताना विनंती पत्रे, सहकार्य व समन्वय हा शांततापूर्वक मार्ग अवलंबला जात आहे. तलावाची जैवविविधता नैसर्गिकरित्या टिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल आदई येथील तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, त्याचबरोबर निर्माल्याचे साम्राज्य असल्याने एक प्रकारे जलप्रदूषण होत होते. त्याचबरोबर या जलाशयाचे सौंदर्य सुद्धा हरपत चालले होते.
लोकांच्या प्रचंड प्रयत्नांमूळे व त्यांनी केलेल्या जनजागृतीमूळे पनवेल महानगरपालिका स्वत:हून मदतीला धावली हे विशेष !!!
सिडकोच्या अधिका-र्यांनी तातडीने तलावावर निर्माल्य कलश बसवून सहकार्य केले. या सर्व कामात पनवेल महानगरपालिकेच्या अधिक-र्यांनी पनवेल वेस्ट वॉरियर्सना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. हा प्रोजेक्ट म्हणजे PMC व CIDCO दोघांच्या परस्पर सहकार्य व समन्वयामूळे लोकांचे व निसर्गाचे भले होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे.
नवीन पनवेल येथे सध्या अस्तित्वात असलेल्या या तलावाचा बराचसा भाग डम्पिंग ग्राउंडमूळे बुजत आहे. आता आदईच्या तलावाचा काही भाग शिल्लक राहिलाय. सिमेंटच्या जंगलात हा एकमेव तलाव निसर्गाची साक्ष देतोय. तो पुर्ववत विस्तीर्ण करुन देण्याची कळकळीची विनवणी लोकांनी सरकारला केली आहे.
हा जलाशय नैसर्गिक असल्याने पावसाचे पाणी या ठिकाणी साचू शकते याखेरीज वातावरण थंड राहण्यासही मदतही होते. या ठिकाणी गणपतींचे विसर्जन, दुर्गपूजा व छट पूजा व अस्थीविसर्जन होत असल्याने या तलावाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेऊन सफाई दरम्यान पालापाचोळा व सहज विघटन होणारे पदार्थ खड्यात पुरुन जमिनीची सुपिकता वाढवण्याचे प्रयत्न केले. नॉन बायोडीग्रेडेबल वस्तू व प्लास्टिक ट्रकभरून टनावारी निघाल्याने भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. PMC ने पुर्वी प्लास्टीक वापरावर बंदी आणली होती. आता त्याच मोहीमेची कडक अंमलबजावणी करुन पनवेलकरांना असाध्य रोगांपासून वाचवावे, तलावाच्या बाजुला रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे ही विनंती लोकांनी सरकारकडे केली आहे.
स्वच्छता ड्राईव्ह निमीत्त मुलांकडून चित्रे व पोस्टर्स बनवून घेतली गेली. चिमुरड्यांनी
फलकांच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. पुढील पीढीवर श्रम व पर्यावरण जतानाचे संस्कार करण्याचा प्रयत्न पनवेल वेस्ट वॉरियर्सनी केला. शालेय विद्यार्थ्यांनीही आदई तलाव स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण विषय फलक हातात घेऊन समाजाला एक वेगळा संदेश दिला. त्याचबरोबर नैसर्गिक जलाशय स्वच्छ ठेवा, त्यामध्ये प्लास्टिक आणि इतर कचरा टाकून जलप्रदूषण करू नका, निर्माल्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कलशामध्ये ठेवा. अशा प्रकारचे फलक तयार करून त्यांनी प्रबोधन आणि जनजागृती केली.
लोकसहभागातून लोकांनी लोकांसाठी, निसर्गाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे आगळेवेगळे अभियान राबवून संबंधित सामाजिक संस्थांकडून आदर्श वस्तूपाठ ठेवण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या मोहीमा यापुढील काळामध्ये राबवण्याचा संकल्प संबंधित संस्थांनी केला आहे.
पनवेल / वार्ताहर : - पनवेल वेस्ट वारियर्सनी जनजागृती करण्यासाठी आदई हिरवाई ग्रुप, CKT एनसीसी, क्रियेट टुगेटर फाऊडेंशन, पतंजली योग ग्रुप, रोबिनहुड आर्मी, रोटरेक्ट व रोटरी क्लब ऑफ पनवेल, संकल्प फाउंडेशन, सिंधुदुर्ग रहिवाशी संघ यांना एका छत्राखाली आणले. सर्वांनी मिळून, आदई तलाव लोकसहभागातून स्वच्छ करण्याचे काम २८ नोव्हेंबर २०२१ पासून हातात घेतले. त्यासाठी क्लीनअप ड्राईव्ह योजले. सामाजिक कार्य करताना विनंती पत्रे, सहकार्य व समन्वय हा शांततापूर्वक मार्ग अवलंबला जात आहे. तलावाची जैवविविधता नैसर्गिकरित्या टिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.