को.ए.सो. व्हि.के. हायस्कूल पनवेल येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा...
पनवेल / प्रतिनिधी :- २२ डिसेंबर हा दिवस महान भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. तसेच हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून ही साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकूर , तसेच कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक ए.बी. पाटील,सुविद्या वावेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राधिका ठाकूर यांनी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा अल्पपरिचय करून दिला. तसेच गणित या विषयाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर शशिकला जाधव यांनी गणित विषयावरील शैक्षणिक साहित्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. कु.शिवप्रसाद साखरे या विद्यार्थ्यांने गणिताचे दैनंदिन जीवनातील स्थान या विषयावर आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले तसेच कु.झहीर शेख या विद्यार्थ्याने गणितीय कोडी सोडवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक प्रमोद ठाकूर यांनी 'गणित सोडवताना सर्व पायऱ्या सोडवणे महत्त्वाचे असते आणि असे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चितच यश मिळते' असे विचार मांडले. सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका सुविद्या वावेकर, राधिका ठाकूर , सुनिल हिरे ,नरेंद्र जाधव , रामचंद्र पाटील , नयना पाटील , प्रीती ठाकूर सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
शेवटी स्मिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती ठाकूर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.