नवी मुंबई डाक विभागामार्फत सुकन्यांना "समॄद्धी" चे दान..
नवी मुंबई डाक विभागामार्फत सुकन्यांना 'समॄद्धी' चे दान..!
पनवेल / प्रतिनिधी : -  नवी मुंबई डाक विभाग हा नेहमी त्यांच्या नावीन्यपूर्ण आणि समाजपयोगी उपक्रमासाठी ओळखला जातो. आज दिनांक २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र डाक सर्कलच्या चिफ पोस्ट मास्टर जनरल श्रीमती विणा आर. श्रीनिवास यांच्या पनवेल भेटीच्या अनुषंगाने असाच उपक्रम पनवेल हेड पोस्ट ऑफीस येथे राबविण्यात आला. 

स्त्री भ्रूणहत्या टाळण्यासाठी तसेच मुलीच्या उच्चशिक्षणाच्या व लग्नाच्या खर्चासाठी बचत करता यावी यासाठी भारत सरकारने २०१४ साली 'सुकन्या समॄद्धी योजना' सुरू केली. या योजनेत अत्यंत आकर्षक व्याजदर आणि पालकांना आयकर सवलत उपलब्ध आहे. समाजातील वंचित घटकातील मुलींना या योजनेत सामावून घेण्यासाठी डाक विभाग नेहमी प्रयत्नशील असतो. नवी मुंबई डाक विभागामार्फत पनवेल शहरातील शिवनगर तसेच मागास भागातील मधील शंभर मुलींची सुकन्या समॄद्धी खाती पनवेल हेड पोस्ट ऑफीस येथे उघडण्यात आली. विशेष म्हणजे या मुलींच्या पालकांकडून प्रारंभीची जमा रक्कम न घेता डाक कर्मचा-यांनी स्वेच्छेने स्वतः चे योगदान देऊन खाती उघडली. महाराष्ट्र डाक सर्कलच्या चिफ पोस्ट मास्टर जनरल श्रीमती विणा आर.श्रीनिवास यांच्या शुभहस्ते सुकन्या समृद्धी पासबुकांचे व भेटवस्तूंचे वितरण मुलींना करण्यात आले. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते वृक्षारोपण समारोह पनवेल हेड पोस्ट ऑफीसच्या प्रांगणात पार पडला.

या प्रसंगी नवी मुंबई रीजनचे पोस्ट मास्टर जनरल श्री गणेश सावळेश्वरकर, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्विसेस श्रीमती शरण्या यु, नवी मुंबई डाक विभागाचे वरीष्ठ अधीक्षक डॉ. अभिजीत इचके, पालकवर्ग आणि टपाल‌ विभागातील कर्मचारी उपस्थीत होते.
_______________________

"भारतीय डाक विभाग समाजातील सर्व घटकांचे आर्थिक समवेशन करण्यासाठी नेहमी कार्यरत असतो. आज पनवेल मधील तळागाळातील मुलींना या प्रवाहात सहभागी करून घेण्यात आले. डाक कर्मचा-यांनी 
स्वतः हून सामाजीक बांधीलकीचा परीचय देत आपले अर्थीक योगदान दिले ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे."

- श्रीमती विणा आर. श्रीनिवास,
चिफ पोस्ट मास्टर जनरल,
महाराष्ट्र सर्कल.

Comments