कर्नाळा सर्कल पासून २० मीटरच्या अंतरावर कोणतेही वाहन पार्किंग करण्यास मनाई...
वाहतूक नियंत्रण अधिसूचना अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही...
पनवेल / वार्ताहर : - वाहतूक नियंत्रण अधिसुचना, पनवेल वाहतुक शाखेच्या हद्दीतील , कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक , टपाल नाका , गुरु नानक चौक , आयडीबीआय बँक , भाजपा पार्टी ऑफिस , रुपाली सिनेमा टॉकिज अशा विविध बाजूंनी येणारे रोड एकत्र येतात. सदर ठिकाणी भाजी मार्केट , बँका तसेच बाजारपेठ आहे .
तसेच या ठिकाणी खरेदी करता येणारे नागरिक आपले वाहने इतरत्र कोठेही पार्क करतात. परिणामी तेथे वाहतुक कोंडी होते. कर्नाळा सर्कल हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व या परिसरात यात नमुद केलेल्या विविध आस्थापना असलेने हा परिसर नेहमी गर्दीने गजबजलेला असतो.
कर्नाळा सर्कल हा परिसर हा अतिशय दाटीवाटीचा परिसर असल्याने व येथील परिसरात नागरिकांची नेहमीच जास्त वर्दळ असल्याने त्या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते . त्यामुळे आपत्कालीन परिस्थीती निर्माण झाल्यास या ठिकाणी मदत पाठविणेसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे , महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र . एम . व्ही . ए . ११६ / सीआर / ३७ / टीआर , दिनांक २७ . ० ९ .१ ९९ ६ चे अधिसूचनेनूसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६ ( १ ) ( अ ) ( ब ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पुरुषोत्तम कराड , पोलीस उप आयुक्त, वाहतुक , नवी मुंबई यांनी पुढीलप्रमाणे आदेश केले आहेत.
कर्नाळा परिसरातील वाहतुक सुरळीत होण्याचे दृष्टीने कर्नाळा सर्कल कडे येणा- या
१ ) कर्मवीर भाऊराव पाटील चौक
२ ) छत्रपती शिवाजी महराज चौक
३ ) रुपाली सिनेमा या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावर कर्नाळा सर्कल पासुन २० मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन “ रस्त्यावर पार्क करण्यास मनाई करण्याची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे.
सदरची अधिसूचना दिनांक ०३/१२/२०२१ रोजी पासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहील. वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने , फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.