पनवेल पालिकेची दांडात्मक कारवाई, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे ; सदाशिव कवटे..
पनवेल पालिकेची दांडात्मक कारवाई, व्यवसायिकांनी नियमांचे पालन करावे ; सदाशिव कवटे
पनवेल /रायगड : गेली दोन वर्ष भारत कोरोनाशी लढत आहे. कोरोना संक्रमण कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे,काही दिवसापूर्वी कोरोनाची संख्या कमी झालेली दिसून येत होती, परंतु आता पुन्हा राज्यात कोरोना सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रेक द चैन या करिता नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. सर्वत्र नियम कठोर करण्यात आले असून याची दखल घेत पनवेल महानगर पालिका हद्दीतील व्यवसायिकांना वारंवार सूचना जारी करण्यात येत आहे तरी देखील काही व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास आल्याने कठोर पावले उचलत पनवेल महानगर पालिकेचे अधिकारी सदाशिव कवटे यांनी नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कळंबोली कामोठे खांदा कॉलनी मधील  व्यावसायिकांवर मोठ्याप्रमाणात दंडात्मक कारवाई केली. 
नाईट कर्फ्यू जाहीर केल्याने दुकान व्यवसायिकांना नऊ वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली,असून हॉटेल व्यवसायिकांना पार्सल साठी परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्व व्यवसायिकांनी व नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन  करून  पनवेल महानगर पालिकेला सहकार्य करावे असे आव्हान पालिका अधिकारी सदाशिव कवटे यांनी केले.
Comments