पनवेल येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्साहात साजरी...
आरती संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल (प्रतिनिधी): ब्रम्हा, विष्णू, महेश या तिनही देवतांचे स्वरुप ज्यांच्या ठायी आढळते. आणि त्यामुळेच ज्यांना भाविकांच्या मनात महत्वाचे स्थान आहे. आणि ज्यांच्या प्रती मनामनात अपार श्रध्दा आहे. त्या दत्त गुरुंची जयंती आज शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी आहे.
गावदेवीपाडा पनवेल येथे श्री स्वामी समर्थ मठात नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपती सुधाकर भाऊ घरत, पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके , सह्यायक पोलीस निरीक्षक शरद ढोले व पोलीस शिपाई धनवट,संवेदना प्रकाशन पुणेचे नितीन हिरवे ,पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रशांत शेडगे आणि असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते .या वेळी बोलतांना मठाधिपति सुधाकर घरत यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की श्री स्वामी समर्थांच्या इच्छे मुळेच हे पुस्तक प्रकाशित होत असून याच नित्य पठण केल्यास स्वामी समर्थ नक्कीच संकटाच्या वेळेस भक्तांना योग्य मार्ग दाखवतील.दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ मठात करण्यात आले होते.या वेळी श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा जयघोष, मंत्रपठण, आरती, होमहवन, लघुरुद्र, दत्तयाग असे विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने झाले. दर्शनासाठी स्वामी समर्थ मठा बरोबरच इतर दत्त मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले .या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले . श्री ची काकड आरती ,नित्यनैमितिक पूजा प्रसाद ,लघूरूद्र ,दत्त जन्म सोहळा ,श्री दत्त गायत्री होम हवन ,श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांची भजने त्या नंतर श्री ची महाआरती आणि महादेव बुवा शहाबाजकर आणि मंडळी यांची भजने झाली .उत्सवात मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांनी सहभाग घेतल्याचे मठाधिपती सुधाकर घरत यांनी सांगितले .