अवजड वाहनांची अवैध पार्कींग करणार्या सहा वाहन चालकांविरुद्ध तळोजा पोलिसांची धडक कारवाई..
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात अवैधरित्या अवजड वाहनांची पार्कींग करणार्या सहा जणांविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात अनेक ठिकाणी अजवड वाहने उभी करण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे कित्येकदा अपघात होतात तसेच वाहतुकीस अडथळा होतो. याबाबत वारंवार सुचना करून सुद्धा वाहन मालक व चालक या सुचनांचे पालन करीत नसल्याने तळोजा पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने या भागात उभ्या केलेल्या ट्रेलर, टँकर अशा एकूण सहा वाहन चालकांवर भादवी कलम 283, मो.वा. कायदा कलम 122/177 प्रमाणे कारवाई केली आहे व यापुढे सुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सपोनि राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.