वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम ; रिक्षा चालकाने नियम पाळावेत - वपोनि. संजय नाळे
पनवेल/रायगड
लोकडाऊन मुळे रिक्षा चालक हतबल झालेला आहे . हळू हळू व्यवसाय पूर्व येत आहे सध्या पनवेल वाहतूक शाखा पनवेल RTO च्या वतीने कारवाई मोहीम सुरु होणार आहे तरी रिक्षा चालकांना बर्दंड बसू नये या करिता नवी मुबंई, पनवेल उरण, परिसरातील रिक्षा संघटनाच्या प्रतिनिधीची बैठक पोलीस उपायुक्त कराड साहेब व वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आली
सर्व रिक्षाचालक व मालक यांना महत्वाची सूचना आपण करावी रिक्षा पासिग , इन्शुरन्स पी यु सी गणवेश व आपले लायसन्स बँच नेहमी सहज दिसेल असे लावावा आर.टी.ओ व वाहतूक शाखे कडुन कडक तपासणी करून कडक कारवाई करण्यात येणार आहे तरी आपण सावधगिरीने जबाबदारीने आपला रिक्षा व्यवसाय करावा जेष्ठ नागरिक ,गोरोदर स्यिया,अंध अपंग ,शाळेतील मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे तसेच महाराष्ट्र राज्य व आपल्या राज्य बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवासी यांच्याशी सौजन्याने वागावे मिटर प्रमाणे भाडे घ्वावे असे उपायुक्त कराड साहेब यांनी निर्देश दिले
आर. टी ओ चे दंड भरमसाठ वाढ झालेली आहे आपल्याला विनंती आपण आपल्या गाडी चे पेपर वेळेत पुर्ण करून घ्यावेत रिक्षा रांगेत लावुनच प्रवासी घ्वावे वाहतूक सिग्नल झेब्रा काँर्सीग नो पार्किग गेट समोर गाडी लावु नये तसेच व्यसन करून कधीही वाहन चालवु नका असे पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय नाळे यांनी या वेळी संघटना प्रतिनिधीना या वेळी सूचित करण्यात आले. रिक्षा चालकांना कारवाई होण्याआगोदर माहित दिल्याने रिक्षा चालक सर्व नियम काटे कोट पाळेल असा रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी विश्वास दिला या बैठकीमध्ये या वेळी पनवेल उरण नवी मुबंई येथील रिक्षा संघटना उपस्थित होते.