मनसे पनवेल शहरच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न...
 
मनसे पनवेल शहरच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न...
पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर आयोजित रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत मोनाली तांबोळी यांनी प्रथम क्रमांक , अस्मी शेटे यांनी व्दितीय क्रमांक , मृणाल वाणी यांनी तृतीय क्रमांक तर स्नेहल राणे व श्वेता खैरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन पनवेल शहर मनसेचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील आणि आकाश घाटे यांनी केले होते. या प्रसंगी महिला आघाडीच्या वर्षा पाचभाई,प्रीती खानविलकर,स्वरूपा सुर्वे, मनसेचे ,पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैंद्य,शहर अध्यक्ष संजय मुर्कृटे,तालुका सचिव केदार सोमण,शहर उपाध्यक्ष मंदार पाटणकर,प्रकाश लाड,सचिन सिलकर,आकाश दलाल,अक्षय जोशी,अवधुत ठाकुर,अनिमेश  ओझे,अतिष म्हामुणकर आदी उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
Comments