कर्नाळा सर्कल येथील दोन्ही पुरातन मंदिरे कायम ठेऊन परिसराचे होणार सुशोभिकरण - नगरसेवक राजू सोनी...
कर्नाळा सर्कल येथील दोन्ही पुरातन मंदिरे कायम ठेऊन परिसराचे होणार सुशोभिकरण - नगरसेवक राजू सोनी
पनवेल दि.05 (वार्ताहर): वाहतूक कोंडीमुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्नाळा सर्कलचे आकारमान कमी करण्यात येत असून असे असले तरी जोशी कुटूंबियांची असलेली दोन्ही पुरातन मंदिरे त्याठिकाणी कायम राहणार आहेत व उर्वरित भागाचे सुशोभिकरण करून तेथील अतिक्रमणे हटवून हा भाग वाहतूकीस मोकळीक करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांनी दिली.
            कर्नाळा सर्कलमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच परिसरात अतिक्रमणसुद्धा होत होते. त्यामुळे वारंवार वाहतूक शाखेकडून सदर सर्कलचा आकार कमी करण्यासंदर्भात सूचना महानगरपालिकेस येत होत्या. या संदर्भात आ.प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याठिकाणी असलेले जोशी कुटूंबियांशी नगरसेवक राजू सोनी यांनी वारंवार चर्चा करून व त्यांनी दिलेल्या परवानगी नंतरच या सर्कलचे आकारमान कमी करण्याच्या कामाला सुरवात केली आहे. आगामी काळात तेथील दोन्ही मंदिरे कायम राहतील तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात येईल व सर्कलचे आकारमान कमी करून आजूबाजूचे सर्व अतिक्रमण काढून वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी सुंदर अशी वास्तू तेथे उभारण्यात येईल अशी ग्वाही नगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी दिली.           
Comments