अवजड वाहनाला झालेल्या अपघातात १ ठार १ जखमी...
अवजड वाहनाला झालेल्या अपघातात १ ठार १ जखमी....

पनवेल, दि.6 (संजय कदम) ः वाहन परवाना नसताना सुद्धा ताब्यातील अवजड वाहन बेदरकारपणे चालवून त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहनाला झालेल्या अपघातात वाहन चालकाला मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे.
पनवेल जवळील कर्नाळा खिंडीतील तलावाजवळून आपल्या ताब्यातील अवजड वाहन घेेवून लक्ष्मण फुलावरे (40) रा.सोमटणे फाटा, हा चालला असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाला अपघात होवून या अपघातात तो स्वतः गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. तर त्याचा सहकारी प्रभाकर थोरात (50 रा.रामराज) हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments