कामोठे गावच्या प्रलंबित समस्या सोडवा, मगच नोडचे हस्तांतरण करा ; कामोठे ग्रामस्थांची सिडकोकडे मागणी..
कामोठे गावच्या प्रलंबित समस्या सोडवा, मगच नोडचे हस्तांतरण करा ; कामोठे ग्रामस्थांची सिडकोकडे मागणी..

पनवेल / वार्ताहर : -  कामोठे ग्रामस्थांच्या वतीने गाव पंच कामिटी तर्फे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक यांना कामोठे गावच्या समस्या सोडवाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. 
 
सिडको प्रकल्पग्रस्त कामोठे गावच्या जमिनी कवडी मोल भावाने संपादन करताना सिडको कडून सेवा, सुविधा, नोकरी धंद्याची अनेक आश्वासने जाहीर करण्यात आली होती.
आज कामोठे विभागाचा सिडको कडून महापालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अंतिम टप्प्यात आला आहे. गावकऱ्यांना देऊ केलेल्या 12.5 % योजनेच्या भूखंडापैकी 3.75 % भूखंडाची जागा सुविधांच्या नावे सिडकोने पूर्वीच कापुन घेतले आहेत . यामुळे आज शहरांतील रस्ते, मैदाने, शाळा, मार्केट आणि हॉस्पिटले अश्या ज्या सुविधा उभ्या केल्या गेल्या त्या जमिनीसाठी आमचे प्रत्येक शेतकऱ्याचा आपण दिलेल्या12.5 %  भूखंडा पैकी 3.75% कापलेला आहे.याचा कदाचित सिडकोला विसर पडलेला आहे. 
गावाच्या शेजारी या सर्व सुविधा आपण निर्माण करणे अपेक्षित होते. मात्र गावकऱ्यांना या सुविधान पासून वंचित ठेवलेयं असे आजचे निराशाजानक वास्तव आहे.
यासाठीच सिडको प्रकल्पग्रस्त मूळ गावाच्या समस्या प्रलंबित ठेवून कामोठे नोडचां पालिकेकडे हस्तांतरणास कामोठे ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे

 प्रलंबित मागण्या
1) पालिका प्रकल्पग्रासतांची बांधकामे तोडणार नाही याची हमी सिडकोने द्यावी 
# शासनाकडे गेली 30 वर्षे येथील प्रकल्पग्रस्त गावांची वाढीव गावठाणे निर्देशीत करण्यासाठी आणि  गरजेपोटीची नैसर्गिक बांधकामे नियमित करण्यासाठी मागणी करीत आहोत, आमच्या गावा मध्येही अशी नैसर्गिक गरजेपोटीची बांधकामे आहेत आपण हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याआधी वाढीव गावठाणे निर्देशीत करून त्यातील सर्व बांधकामे सरसकट नियमित करावीत.भविष्यात नवी मुंबई शहरास स्वतःची कसती जमीन कवडिमोल भावाने देऊन भूमिहीन झालेल्या इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे एकही बांधकाम पालिकेने तोडता कामा नये याची हमी Cidco ने घ्यायला हवी 
2) कामोठे गावासाठी खेळाचे मैदान 
# कामोठे गावास लागून दोन बाजूस पूर्वी खेळाची मैदानं होती ज्यावर गावातील तरूण क्रिकेट, व्हॉलीबॉल वा तत्सम खेळ खेळत होते आज शहरीकरणात या गावाभोवती मैदानच राहिलेले नाहीत तरी कामोठे गावासाठीचे खेळाचे मैदान तातडीने आरक्षित करावे
 3) गावाच्या भोवटली पार्किंग प्लॉट मिळावेत 
# गावात आळी आणि अथवा विभाग आहेत ज्यामध्ये अरुंद रस्ते व गल्ल्या आहेत.पूर्वी गावात सायकल व स्कूटर इतपत वाहतूक व्यवस्था असल्याने मुख्य व रस्ता सोडला तर सर्वत्र अरुंद गल्ली वजा रस्ते आहेत. आज मितीस सर्व घरात उदरनिर्वाहासाठी रिक्षा आल्या आहेत तसेच काहींनी शाळेसाठी वॅन व खाजगी चारचाकी गाड्या घेतलेल्या आहेत.मात्र गावात अरुंद गल्यांमुळे  सर्व गाड्या मुख्य रस्ता,पालखी रस्त्यांना व गावाभोवतीच्या रस्त्यांना नाईलाजाने उभ्या केल्या जातात.या पार्किंग समस्येमुळेच गावात अब्युलंस फिरणे मुश्कील झालेले आहे.तरी गावाभोवती मोकळे असलेले भुखंड गावकऱ्यांना वाहनतळासाठी तातडीने आरक्षित करावे असे वाहनतळ गाव मोठा असल्याने गावाच्या चारही बाजूस द्यावेत 
4) प्रकल्पग्रसतांसाठी कम्युनिटी सेंटर बनवावे 
 # सिडकोने विविध नोड मध्ये शहरांमध्ये  तसेच प्रकल्पग्रस्तां करिता भूमिपुत्र भवन,आगरी कोळी भवन असे कम्युनिटी सेंटर बनवलेले आहेत या  कम्युनिटी सेंटर मधून प्रकल्प ग्रस्त लग्नसोहळे,वाढदिवस, व्यायामशाळा, वाचनालय व समाज प्रबोधनाचे काम चालवले जाते. कामोठे येथील प्रकल्पग्रस्तां करिता असे कमुनिटी सेंटर सिडकोने बनवावे.
 5) गावासाठी पाण्याची लाईन व टाकी 
# कामोठे गावात बारा महिने पाणी टंचाई असते. 1996 सालची गावाची पाईप लाईन आता जीर्ण झालेली आहे. ग्रामपंचायत असताना 2009 साली तिची डागडुजी झालेली होती.आज ती ठिक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहे यामुळे गावात पाणी 
मुबलक मिळत नाही. तसेच पाण्याचा साठा करण्यासाठी लोकवर्गणी द्वारे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बनवलेली पाण्याची टाकी निरूपयोगी ठरल्याने तिचा वापर करण्याजोगा नाही. तरी आपण सदरची पाण्याची जुनी लाईन काढून नवीन पाण्याची लाईन टाकून द्यावी व गावात पाण्याची नवी टाकी बांधून द्यावी.

गावाकऱ्यांच्या या मागण्यांचा सिडकोने हस्तांतरण प्रक्रियेआधी सहानभुतीने आणि गांभीर्यपूर्वक  विचार करावा.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यास ग्रामस्थांचा विरोध राहील.आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू तरी आपण ती वेळ येथील शहर वसवण्यासाठी त्याग सोसलेल्या प्रकल्पग्रस्तांवर आणू नये अशी विनंती कामोठे ग्रामस्थांनी सिडको कडे केली आहे
हे निवेदन देण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पंच राजेश गायकर, भालचंद्र म्हात्रे, सुनील गोवारी, रवि गोवारी,भगवान म्हात्रे,विकास नाईक उपस्थित होते. सिडकोचे सहव्यवस्थापकीय सचालक, मुख्य वास्तुविशारद आणि नियोजनकार , पुनर्वसन अधिकारी व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आदींना सदर निवेदन माहितीसाठी यावेळी देण्यात आले आहे.
Comments