विहिघर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितिची सभा संपन्न ; ४ जानेवारीला पनवेल येथे उपोषण...
पनवेल / वार्ताहर : - हनुमान मंदिर, विहिघर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिति आणि शेतकरी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ उपोषण करणार असल्याचे नामदेवशेठ फडके यांनी सांगितले.
विमानतळामुळे होत असले
पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास मात्र शेतकऱ्यांना भकास करणारे आहेत. यावेळी नैनाविरोधात एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल. असे एडवोकेट विजय गडगे यांनी सांगितले. तर सांगडे येथील स्मशानभूमी भोकरपाडा येथे काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे येथील प्रेत २० किलोमीटरवर आनायच का असा सवाल सुरेश पवार यांनी केला. अधिवेशनात आमदार नैनाचा प्रश्न उपस्थित करत नसतील तर रायगड मधील आमदार अधिवेशनात जातात कशाला असा सवाल अनिल ढवळे यांनी केला. नैनामुळे सध्या घर बांधताना देखील भीती वाटत आहे. सिडको धंदा करत आहे, व राजकीय पुढारी विकले गेले आहेत. त्यामुळे आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो असे अनिल ढवळे यांनी भाषणात सांगितले. नैनामध्
येत्या ४ जानेवारी रोजी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. नैनाप्रकल्पात शेतकऱ्याला ४० टक्के मिळणार नसून केवळ ३२ टक्के जागा मिळणार असल्याचे जॉईंट एम डी यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सांगितले असल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. या सभेला नामदेवशेठ फडके, सुरेश ठाकूर, वामन शेळके, सुभाष भोपी, सुरेश पवार, राजेश केणी, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, नारायण पाटील, सुनील पाटील, जगन फडके, सुदाम वाघमारे, रविंन्द्र फडके, मदन गोवारी, कुंदा पवार, बाळाराम फडके, रमेश पाटील, दिलीप फुलोरे, डि के भोपी, बबन फडके, गजानन पाटील, शेखर शेळके, सुरेश पाटील, रामचंद्र फुलोरे, रामचंद्र वाघमारे यांच्यासह अनेक उपस्थित होते.