अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ ; शेतीसह विटभट्टींचे नुकसान....
अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ ; शेतीसह विटभट्टींचे नुकसान....

पनवेल, दि.१ (वार्ताहर) ः  अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची धावपळ झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे शेतीसह विटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
रायगड जिल्ह्यात तीन दिवस हवामान खात्यातर्फे अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे आज पहाटेपासून या पावसाला सुरूवात झाल्याने सकाळी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांची चांगलीच धावपळ झाली व त्यांना भिजत भिजत रेल्वे स्टेशन व एस.टी.स्टॅण्ड गाठावे लागले. या पावसाचा फटका पनवेल परिसरात चांगलाच बसला आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे या अशा अवकाळी पावसामुळे शेतीसह इतर पिकांचे नुकसान होत आहे. तसेच या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वीटभट्टी लावण्यात येते. परंतु अशा पावसामुळे वीटभट्टीचे सुद्धा नुकसान झाल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. पावसाबरोबर दमट वातावरण झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर सुद्धा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments