महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली पोस्टल एम्लॅाईज युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न..
पनवेल / वार्ताहर : - राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) या राष्ट्रीय संघटनेबरोबर संलग्न असलेली नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॅाईज चे २२ वे राष्ट्रीय व महाराष्ट्र गोवा सर्कलचे २६ वे अधिवेशन इंटकचे राष्ट्रीय सचिव तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली श्री. क्षेत्र आळंदी देवाची येथे संपन्न झाले.
कोरोना काळात डॉक्टर, पोलीस या कोरोना योद्धांच्या प्रमाणेच पोस्टल कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले. अतिशय दुर्गम भागात जेथे रस्ते, इंटरनेट ची सुविधा नाही अश्या दुर्गम भागात पोस्ट कर्मचारी पोहोचून नागरिकांना शहराशी जोडून ठेवण्याचे काम करत असतात अश्या कर्मचाऱ्यांचे श्री. महेंद्र घरत यांनी अभिनंदन केले. तसेच आजपर्यंत इंटकचा नेता म्हणून पोस्टल कर्मचार्यांच्या नेहमीच पाठीशी उभा राहतोय. यापुढेही पाठीशी उभा राहीन असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या अधिवेशनासाठी देशभरातून ८०० कर्मचारी उपस्थित होते. विविध राज्यातून आलेल्या सन्माननीय व्यक्तींचा महेंद्र घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.