वार्दोली व मोह येथील शेकडो तरुणांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश...
पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांचा पुढाकार...
पनवेल / वार्ताहर : - शनिवार दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री (महाराष्ट्र राज्य) आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या विशेष प्रयत्नाने, वार्दोली व मोह येथील, मयूर भोपी, शरद म्हात्रे, किरण भोपी, रवी भोपी, अनंता पाटील, धोंडूराम भोपी, हिरू भोपी, राम भोपी, रोशन कडव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, उपतालुका प्रमूख नरेश पाटील, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विभाग प्रमुख मनेश पाटील, उपविभाग प्रमुख अनिल तळवणेकर शिवसैनिक अरुण पाटील आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.