समाजसेवक जय कुमार डीगोळेवर कामोठ्यात प्राणघातक हल्ला ; हल्ला करून अज्ञात इसम फरार..
डिगोळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
पनवेल दि.13 (वार्ताहर)- कामोठे वसाहतीमधील रहिवाशी तसेच समाजसेवक जय कुमार डिगोळे यांच्यावर काही अज्ञात इसमानी प्राण घातक हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कामोठे वसाहतीमधील सेक्टर 11 मध्ये घडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात डोगोळे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर कामोठे मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा हल्ला करताना आरोपीनी लोखंडी सळ्या तसेच, लोखंडी पाईप चा वापर केल्याचे डिगोळे यांनी सांगितले, या घडलेल्या प्रकारा विरोधात अज्ञात इसमावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
जय कुमार डिगोळे हे कामोठे वसाहतीमधील समाजसेवक असून भाजप पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात, डिगोळे ये नेहमी प्रमाणे वसाहतीमध्ये फेरफटका मारून सेक्टर 11 मधील आपल्या राहत्या घरी जाण्यास निघाले, या वेळी त्यांना त्यांच्या मित्रांनी मोटारसायकल वरून राहत्या सोसायटी शेजारी सोडले, त्या नंतर ते सोसायटीच्या दिशेने निघालो, या वेळी रात्रीचे 8 वाजून 30 मिनिटं झाले होते. डोगोळे हे सोसायटीच्या गेटवर पोचल्या नंतर, काही अज्ञात इसम हे डोगोळे यांची वाट पाहत बसले होते, डोगोळे हे गेट वर पोचल्या नंतर, या अज्ञात इसमानी हाता मध्ये असलेल्या लोखंडी पाईप आणि सळ्यानी त्याच्यावर हल्ला चढवला , डिगोळे यांनी हल्ला परतवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र, हल्ला इतका भयानक होता की, या मध्ये त्याच्या उजव्या पायाला जखम झाली असून फॅक्चर झाले आहे. तसेच अंगावर इतर ठिकाणी मुक्का मार देखील लागला आहे. हा हल्ला करतांचा आपले प्राण वाचवण्यासाठी त्यांनी सोसायटीमध्ये धाव घेतली, आणि याच वेळी, हे अज्ञात इसम सोसायटीच्या गेट वर परत पळून गेले, या वेळी हे हल्लेखोर रिक्षाच्या मदतीने मधून पळून गेले असल्याची माहिती डिगोळे यांनी दिली, या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमाचा शोध पोलीस घेत आहे.
चौकट
दिवसा ढवळ्या हल्ला करणाऱ्याचा शोध घ्यावा : हेमलता गोवारी नगरसेवीका
कामोठे वसाहतीमधील समाज सेवक जयकुमार डोगोळे यांच्या वर झालेला हल्ला हा थरकाप उडवणारा आहे. कामोठे वशातीमध्ये गेल्या काही दिवसा पासून अनैतिक तत्वाच्या घटनांना उत आला आहे. चैन स्नैचिंग, फसवणूकी सारखे प्रकार वाढले आहे. त्या मुळे वेळीच अश्या प्रकारावर आला घालण्याची मागणी नगरसेविका हेमलता गोवारी यांनी केली आहे.
फोटोः डिगोळे यांच्या पायाला झालेली जखम