सिप्ला द्वारे आयोजित " व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स " शिबिर बेलवली येथे संपन्न
पनवेल / वार्ताहर : -
पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स हा कार्यक्रम सुरू झाला.सदर कार्यक्रम सिप्ला द्वारे आयोजित करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या बेलवली येथील प्राथमिक शाळेत हे शिबिर घेण्यात आले. गेल्या 3 महिन्यांत 7 हजार लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार विजय तळेकर, सिप्लाच्या उल्का धुरी आदी उपस्थित होते.