रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण..
रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः रिक्षावर दंडात्मक कारवाई केल्याचा राग मनात धरुन रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना खारघर वसाहत परिसरात घडली आहे.
खारघर वसाहत परिसरात एका वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरुन सदर रिक्षा चालकाने लोखंडी सळईने वाहतूक पोलिसाला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वाहतूक पोलिसाला दुखापत झाली असल्याने रिक्षा चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments