शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अविष्का घरत चे घवघवीत यश...
शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अविष्का घरत चे घवघवीत यश...
 

पनवेल (प्रतिनिधी)
        महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळा मार्फत ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च  प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता पाचवी) निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कु.अविष्का महेश घरत इयत्ता पाचवी मराठी माध्यम हिने नवी मुंबई विभागात प्रथम तर ठाणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तिला ८७.३३  टक्के गुण मिळाले आहेत.
              कु.अविष्का महेश घरत ही ज्ञान विकास प्राथमिक विद्यालय कोपरखैरणे या विद्यालयाची विद्यार्थिनी असून या विद्यालयाचे  ओमकार तानाजी काळे ,सत्यवान संदीप धापते, साईराज संतोष बैलकर, शिवराज अनिल चटाले हे चार विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
   कु.अविष्का महेश घरत हिस मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.पी.सी.पाटील, मार्गदर्शक दळवीसर, पडळकरसर, बोडकेसर तसेच सौ. ईशा सावंत, अलका चव्हाण, मुख्याध्यापिका सुमित्रा पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे.
Comments