कामोठे वसाहतीमध्ये औषध फवारणी करून घ्यावी : नगरसेवक सखाराम पाटील
कामोठे वसाहतीमध्ये औषध फवारणी करून घ्यावी : नगरसेवक सखाराम पाटील 

पनवेल दि.13 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिका हद्दीत गेल्यात 15 दिवसात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएटने थैमान घातले आहे. दिवला 1500 हून अधिक रूग्ण पालिका हद्दीत आढळून येत आहे. या मध्ये खारघर पाठोपाठ कामोठे वसाहतीमध्ये सर्वाधीक रूग्ण आढळून आले आहेत. तसेच  20 टक्क्या हुन अधिक इमारती कटेन्मेंट झोन म्हणून बंद करण्यात आल्या आहे. 
               या वसाहती मधील 100 हुन अधिक इमारतीचा समावेश आहे. अशी परिस्थिती कामोठे वसाहतीमध्ये आढळून येत आहे. त्या मुळे या वसाहतीमध्ये दैनंदिन औषध फवारणी करावी अशी मागणी शेकापचे नगरसेवक सखाराम पाटील यांनी केली आहे. या औषध फवारणी सोबत ज्या वशातीमध्ये 5 पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. त्या इमारते मध्ये तसेच त्या मजल्यावर मोफत सॅनेटायझर फवारणी करावी अशी मागणीचे निवेदन नगरसेवक सखाराम पाटील यांनी पालिका आयुक्त तसेच वॉर्ड ऑफिसर अरविद पाटील यांना दिले आहे. या वेळी समाजसेवक सनिल पाटील, संतोष शितोळे मंडळाचे अध्यक्ष शैलेश माने हे उपस्थित होते.
            
Comments