बारमधून तीन मोबाईलची चोरी
पनवेल, / दि.10 (संजय कदम)- बारमध्ये काम करणारे कर्मचारी तेथील रूममध्ये झोपले असताना तेथे आलेल्या एका इसमाने त्या रूममधील तीन मोबाईल चोरी करून पळून गेल्याची घटना असूडगाव परिसरात घडली आहे.
असूडगाव से.-4 येथील बारमध्ये काम करणारे कर्मचारी अरूण पासवान व त्यांचे दोन मित्र तेथील एका रूममध्ये झोपले असताना यावेळी त्यांचा सहकारी हृतिक सिंग याचा भाऊ अमितकुमार सिंग याने त्याला भेटण्याचा बहाना करून त्या रूममध्ये प्रवेश केला व तेथील तीन मोबाईल फोन चोरून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.