पनवेल( प्रतिनिधी) पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी (दि. 13) आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गायकर व सहकार्यांचे पक्षात स्वागत केले.
पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, हरेश केणी, बबन मुकादम, खारघर सरचिटणीस किर्ती नवघरे, सुरेश ठाकूर, दत्ता वर्तेकर, विजय पाटील, विश्वनाथ केणी, के. के. म्हात्रे, भाऊ भगत, मोतीलाल कोळी आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी उपसरपंच संतोष गायकर, शेकाप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पूनम गुरुनाथ गायकर, पुरोगामी युवक संघटनेचे शहर अध्यक्ष सुदर्शन नाईक, जैन, गुजराती समाजाचे जिल्हाध्यक्ष विनोद पटेल, चंदगीराम बलवान, पटेल समाजाचे अध्यक्ष मुकेश पटेल, धरमवीर, प्रवीण शिंदे, राजेंद्र सोनी, जयेश गायकर, रामचंद्र रांजणे, विनोद मुसा, रोहिदास गायकर, पांडुरंग गायकर, अशोक वायदंडे आदींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले.