खारघर येथे शिवसेना पनवेल विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक संपन्न..
खारघर येथे शिवसेना पनवेल विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक संपन्न..

पनवेल / वार्ताहर : - रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड (पनवेल) शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार संघ-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी संघटन, महापालिका निवडणुका, प्रत्येक ग्रामीण व शहरी विभागातील कामाचे स्वरूप, या संदर्भात पोट तिडकीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीस शिवसेना रायगड सल्लागार रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका संघटक, तालुका संपर्कप्रमुख, विधानसभा समन्वयक, महानगर प्रमुख, तालुका प्रमुख, ग्रामीण तालुका प्रमुख, महानगर समन्वयक, उपतालुका संघटक, उपतालुका प्रमूख, उपमहानगर प्रमुख, सर्व शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी, तसेच युवासेना व युवतीसेना चे सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना उत्तर भारतीय सेल चे पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने होते.
Comments