सिनियर टी क्रिकेट क्लब पनवेल व माजी नगराध्यक्ष सहित मुल्ला यांच्या प्रयत्नाने ओपन जिमच्या खेळण्यांची दुरूस्ती..
सिनियर टी  क्रिकेट क्लब पनवेल व माजी नगराध्यक्ष सहित मुल्ला यांच्या प्रयत्नाने ओपन जिमच्या खेळण्यांची करण्यात आली दुरूस्ती..
पनवेल दि.04 (संजय कदम  ): पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा सिनियर टी  क्रिकेट क्लब पनवेल व माजी नगराध्यक्ष सहित मुल्ला यांच्या प्रयत्नाने क्रिडा संकुल परिसरात असलेली नादुरूस्त ओपन जीमच्या खेळण्यांची दुरूस्ती शासनाकडे पाठपुरावा करून घेण्यात आली आहे.
           एचओसी कॉलनी जवळील क्रिडा संकुल परिसरात असलेली ओपन जीमची काही खेळणी नादुरुस्त झाल्याने तेथे व्यायम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. हि बाब सिनियर टी  क्रिकेट क्लब पनवेल व माजी नगराध्यक्ष सहित मुल्ला यांना समजताच त्यांनी या संदर्भात मनीषा मानकर क्रीडा अधिकारी पनवेल व रवी नाईक अलिबाग जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, सुभाष पाटील, प्रफुल फडके, सुहास देशमुख, कुणाल सावंत, संदीप पाटील, डॉक्टर राऊत, डॉक्टर वैभव पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील आदींंनी प्रमाणिक प्रयत्न करून या ओपन जीममधील क्रि़डा साहित्य दुरूस्त करून घेतले व आता गैरसोय टळल्याने पूर्वीसारखेच नागरिक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येऊ लागले आहेत.        


Comments