पनवेल परिसरातील झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तीन जखमी...
पनवेल परिसरातील झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तीन जखमी...

पनवेल, दि.2 (संजय कदम)- पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.          पनवेल जवळील साईदिप हॉटेलजवळून फिर्यादी सस्मीत डोके (वय-35, रा.-डेरवली) हा शिवनाथ साह (वय-34, रा.-एपीएमसी मार्केट) हे दोघे दुचाकीवरून पनवेल बस डेपो बाजूकडे येत असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सफेद रंगाच्या कारवरील चालकाने त्यांच्या गाडीस धडक दिल्याने यात ते दोघे जखमी होऊन या अपघातात शिवनाथ साह याचा मृत्यु झाला आहे. सदर घटनेनंतर कारचालक कारसह पळून गेला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत खांंदा वसाहत येथील नवीन पनवेल ते खांदा कॉलनी ओव्हर ब्रीजवरून फिर्यादी स्वाती दास (वय-55) या रिक्षाचालक विकी गायकवाड (वय-28) याच्या रिक्षातून जात असताना पुढे चाललेल्या डंपरला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाले असून रिक्षाचेही नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments