मधुबन कट्ट्याचे ७५ वे कविसम्मेलन बोकडविरा येथे संपन्न..
मधुबन कट्ट्याचे ७५ वे कविसम्मेलन बोकडविरा येथे संपन्न
पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषद उरणच्या मधुबन कट्ट्याचे  ७५ वे कविसम्मेलन बोकडविरा येथे भ.पो.म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन "उत्कर्ष " सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ए डी पाटील होते. मार्गदर्शन करताना त्यांनी रामचंद्र म्हात्रे यांनी सादर केलेल्या लावणीचा संदर्भ घेत लावणीच्या प्रकारांवर समर्पक विचार मांडले.
            
रायगडभूषण प्रा.एल बी.पाटील यांनी येथे सादर झालेल्या कवितांमधील परिपक्वतेचे विचार सुस्पष्ट करून आनंद दिला. ७५ व्या कविसम्मेलनाचे औचित्य साधून ज्येष्ठ कवी आणि लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे यांचा सत्कार गोपाळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. तसेच आपल्या मधुर वाणीत कवितांचे सुरेख सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले. कविसम्मेलनात रायगडभूषण
प्रा. एल.बी पाटिल,ज्येष्ठ कवी ए.डी.पाटील, गोपाळ पाटील, अर्जुन हंडोरे,  लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे, संजीव पाटील, रामचंद्र म्हात्रे, अरुण म्हात्रे, संजय होळकर, भ.पो.म्हात्रे, संपदा पाटील, म.का.म्हात्रे, भरत पाटील इत्यादींनी कविता सादर केल्या.
Comments