अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू...
अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू

पनवेल, / दि.11 (संजय कदम) ः एका अज्ञात वाहनाच्या धडकेने फेरफटका मारणार्‍या एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरढोण गावाच्या हद्दीत घडली आहे.
पनवेल जवळील शिरढोण गावाच्या हद्दीत साईकृपा हॉटेल समोर पेण ते पनवेल रोडच्या कडेला मयत इसम सुरेंद्र जोगी मलिक (38) हा मारीत असताना त्याला अज्ञात वाहनाची ठोकर बसून झालेल्या अपघातात त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सदर वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments