नवनिर्वाचित शिवसेना नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख यांचा कामाचा जोरदार धडाका….
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप..
अनेक नवयुवकांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
पनवेल / प्रतिनिधी : - हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आशीर्वादाने तसेच पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाने आणि नविन पनवेल शहर प्रमुख यतिन विनायक देशमुख , शहर संघटिका अपूर्वा प्रभू ,उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी , विभाग प्रमुख किरण सोनावने यांच्या पुढाकाराने शिवसेना नविन पनवेल शहर आणि एस एन आय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आणि मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून इतर पक्षातून आलेल्या युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी संदेश वाघमारे, तुषार चौधरी ,अक्षय मोकल ,हरिदास सावंत,प्रवीण मोहिते ,महेश करडे ,वसीम शेख ,साईराज मंडले ,मिलन कटेलिया ,कुश बडोनी ,एलन पाल ,सचिन कीर्तने, विकास संदीपोग, आदिश एम.एस., अखिल वेनू , अखिल पिल्लई,रणजित रेमेशान , निखिल पी. अमोल , प्रमोद राजपूरे , मनीष , अश्विन , मिथून यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हासल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम , तालुका संघटक भरत पाटील , महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भारतीय कामगार सेनेचे अभय प्रभू , तालुका युवा अधिकारी पराग मोहिते , पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव , किरण तावदरे, महिला उपजिल्हा संघटिका कल्पनाताई पाटील ,महिला विधानसभा संघटिका रेवती सकपाळ , तालुका महिला संघटिका ग्रामीण मेघा दमडे , विभाग प्रमुख बिपिन झुरे , विचुंबे विभाग विशाल भोईर ,उपविभाग प्रमुख राजेश वैंगणकर , संजय भोसले ,अविनाश गव्हाणकर , शहर अधिकारी जितेंद्र सिद्धू , संदीप तांडेल , सिद्देश गुरव , सतीश गायकर , नंदू खोत ,श्री खडकबन , नागेंद्र कावळे, गणेश शिंदे , संचीता राणे, नम्रता शिंदे ,मंगल नाडार, वैशाली थळी, शारदा पाटील , ज्योती पाटील, सुगंधा शिंदे , अर्चना पाटील , गीता राजगुरू , तनुजा झुरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.