पालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळांमध्ये १५-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणास सुरूवात..
पनवेल,दि.१ : जगात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएटमुळे कोविड- १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) तसेच स्टॅन्डींग टेक्निकल सायन्टीफीक कमिटी (STSC) of (NTAGH) यांनी कोविड १९ लसीकरण वाढविण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. त्यानूसार आज(१जानेवारी) महापालिका क्षेत्रातील शाळांशी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.यामध्ये ११०शाळांनी सहभाग घेतला.
यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेहाना मुजावर यांनी यावेळी केंद्र शासनाने सूचनेप्रमाणे ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड १९ लसीकरण सुरु करण्याविषीयी माहिती दिली.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १,२,३,४,५,६ अंतर्गत दिनांक व वार निहाय शाळांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना लसीकरणाबाबत सूचित करण्यात येणार आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या.
महापालिकेच्यावतीने रोज दहा शाळांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. यासाठी दहा लसीकरणाच्या टिम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्ड बाॅयचा समावेश असणार आहे.
मा.आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील १५-१८ वयोगटातील अंदाजित ४०हजार विद्यार्थ्यांचे नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागास मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्यावतीने १५-१८ वयोगटातील रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रेस नोट मध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे.
चौकट
कोरानाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १५-१८ वयोगटातील मुलांच्या /विद्यार्थ्यांच्या लसीकरणारासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. लसीकरणासाठी पालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.गोसावी यांनी केले आहे.