वाढदिवसाचे अभिष्टचिंतन नको, आरोग्य चिंतनासाठी आरोग्य शिबिरे ठेवावीत :- प्रितम जनार्दन म्हात्रे
पनवेल : सध्याच्या पनवेलमधील कोविडचे वाढते रुग्ण पाहता वाढदिवस साजरा न करण्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी ठरविले आहे.
त्यासंदर्भात त्यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आवाहन केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही केक कापण्याचा कार्यक्रम करू नये त्याऐवजी नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा कशा पोहोचतील यावर लक्ष द्यावे.
कुठलेही पक्षाचे मेळावे वाढदिवसानिमित्त आयोजित न करता सध्याच्या काळात लोकांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम झालेला आहे त्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावे कोविड चे नियम पाळून कसे करता येतील जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ होईल यावर लक्ष द्यावे. .
वाढदिवसानिमित्त कोणताही बुके घेऊन मला भेटू नये त्याऐवजी आपल्या घरातील जवळच्या परिसरात एखादे झाड लावून त्याचा सेल्फी काढून तो फोटो मला शुभेच्छा म्हणून पाठवाव्यात जेणेकरून भविष्यातील पिढीला ऑक्सिजन विकत न घेता पर्यावरण जोपासल्यामुळे त्याचा सहाजिकच फायदा होईल.
या सर्व उपक्रमात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी भावना विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली.