अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू..
अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू

पनवेल, दि.15 (संजय कदम) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना खारघर टोल नाका परिसरात घडली आहे.
अमोल कसबे हा इसम खारघर टोलनाका येथून मोटार सायकलवरुन जात असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments