मंदिराची दानपेटी फोडली
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः खारघर येथील एका मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये चोरुन नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
खारघर येथे असलेल्या इस्कॉन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून तेथे गोळा झालेले लाखो रुपये चोरुन नेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून परिसरात असलेले सीसीटीव्ही आदींच्या माध्यमातून या अज्ञात चोरट्यांचा शोध खारघर पोलीस करीत आहेत.