मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड ; साडेचार लाखाचे मोबाईल हस्तगत..
मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड ; साडेचार लाखाचे मोबाईल हस्तगत..

पनवेल दि.22(संजय कदम): गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्या कडून घरातील *उघडे दरवाजे, तसेच शटर आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून चार लाख पन्नास हजार रूपये किंमतीचे एकुण 28 मोबाईल हस्तगत करून नवी मुंबई, पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, नवी मुंबई, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त गुन्हे महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा विनायक वस्ते यांनी वेळोवेळी आढावा घेवून विशेष मोहिमराबवुन मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन वेळीच प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, कक्ष 2, पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा अभिलेख पडताळून मोबाइल चोरीची पद्धत, तारीख, वेळ या प्रमाणे त्याचे विश्लेशन केले असता काही गुन्हे हे एका ठराविक गुन्हेगारांकडून केले जात असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा कक्ष 2 चे सपोनि फडतरे, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे यांनी केलेल्या तांत्रिक तपासावरून अटक आरोपी नामे सलमान इक्बाल मुकादम, वय 23 वर्ष, यास सापळा रचून पोउनि मानसिंग पाटील व पथकाने ताब्यात घेतले त्यांनतर अटक आरोपीताकडे अतिशय कौशल्यपुर्ण केलेल्या तपासादरम्यान अटक आरोपीकडून 4,50,000/- रूपये किंमतीचे एकुण 28 मोबाईल हस्तगत केले आहेत. सदरच्या गुन्हयाच्या तपासादरम्यान सपोनि संदिप गायकवाड, पोउनि वैभव रोंगे, पोहवा अनिल पाटील, पोहवा ज्ञानेश्वर वाघ, पोहवा प्रशांत काटकर, पोहवा मधुकर गडगे, पोहवा सचिन पवार, पोहवा रणजित पाटील, तुकारामसुर्यवंशी, पोहवा राजेश बैकर, पोना निलेश पाटील, पोना दिपक डोंगरे, पोना सचिन म्हात्रे, पोना रूपेश पाटील, पोना इंद्रजित कानु, पोना राहुल पवार, पोना प्रफुल्ल मोरे, पोशि संजय पाटील, पोशि प्रविण भोपी, पोशि विक्रांत माळी, पोहवा जगदिश तांडेल, पोशि नंदकुमार ढगे, पोशि अभय मेऱ्या यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
फोटो: पनवेलच्या पथकाने गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने अटक केलेल्या आरोपीसह मुद्देमाल.
Comments