आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने अवघ्या बारा तासात केले जेरबंद..
पनवेल दि.23(संजय कदम): एका शिक्षिके महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेने अवघ्या बारा तासात जेरबंद केले आहे. तळोजा पोलीस ठाणे हदिद्त सुरत येथील महिला शिक्षिका वय 21 वर्षे हिची इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या मित्रास त्याच्या वाढदिवसा निमित्ताने मुंबई येथे भेटण्यास आली असताना त्या मित्राने तिला तळोजा येथे त्याचे राहणा-या मित्राचे रूमवरती तिला घेवून जावून तेथे तिला बिअर पाजून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याचे सोबतच्या मित्राने देखिल तिच्या शरीराशी असभ्य चाळे करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदर महिलेस संधी मिळताच तिने सदर रूममधुन पळ काढुन 100 नंबर वर कॉल करून पोलीस मदतीची मागणी केली. परंतु त्यादरम्यान सदरच्या दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला होता. सदर पिडीत शिक्षिका महिलेने झालेल्या प्रकाराबाबत तळोजा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करताच अति संवेदनशिल व गुन्हयाचे गार्ंभीय लक्षात घेवून पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्ते, सुरेश मेंगडे यांनी सदर गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केल्याने नमुद गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाने गोपनिय माहिती व तांत्रिक बाबींचा तपास करून गुन्हयातील पाहिजे आरोपी आयुब इद्रिस खान (21), व शहाबाज जाहिर आली(20) हे त्यांचे मुळगावी रिवा, मध्य प्रदेश येथे रेल्वेने पळुन जाणार असल्याबाबत मिळालेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखा कक्ष 2 नेमणूकीतील पोलीसांचे पथक तयार करून त्यांना तात्काळ लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पाठविण्यात आले. सदरचे आरोपी हे फलाटावरुन मध्य प्रदेश साठी सुटलेल्या रेल्वेने त्यांचे मुळगावी पळुन जात असताना गुन्हे शाखा कक्ष नेमणूकीतील पोहवा वाघ, पोहवा बैकर व पोना डोंगरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जिव धोक्यात घालुन चालु रेल्वे मध्ये चढुन आरोपींचा पाठलाग करून शोध घेवून नमुद गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर ते पुढिल स्टेशनवर उतरले. नमुदच्या आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढिल कारवाईसाठी तळोजा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
फोटो: बलात्कार करणाऱ्या आरोपीसह गुन्हे शाखा कक्ष २ चे पथक