अज्ञात ट्रेलरच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू ..
अज्ञात ट्रेलरच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू 
पनवेल, दि ०७ (वार्ताहर) : एक अज्ञात ट्रेलरच्या धडकेने पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पळस्पे फाटा परिसरात घडली आहे. 
गोवा ते मुंबई लेनवर पळस्पे उड्डाणपुलाच्या अलीकडे असलेल्या पेंटाकास्टल मिशन चर्चच्या समोर तेथील रहिवाशी प्रमोद सरवदे (वय ३६) हा रास्ता ओलांडीत असताना अज्ञात ट्रेलरची धडक त्याला बसल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात ट्रेलर चालकाचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Comments